पिंपरी: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून थकीत वाहन कर वसुलीसाठी जप्त केलेली वाहने वाहन मालकांनी सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. जर ही वाहने मुदतीत सोडवून नाहीत, तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित वाहनांचा ई लिलाव केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड आरटीओच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी, मोटार वाहन कायद्यातील अन्य गुन्ह्यांतर्गत चार वाहने जप्त केली आहेत. ही वाहने सोडवून नेण्यासाठी सदर वाहन मालकांनी परिवहन कार्यालयाकडे संपर्क केला नाही. आरटीओकडून वाहन मालकांना नोटीस पाठवण्यात आली. परंतु, नोटीसा वाहन मालकांना पोच झाल्या नाहीत. तरी संबंधित वाहन मालकांनी पुढील सात दिवसात मोटार वाहन कर, दंड भरून आपली वाहने सोडवून घ्यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. ही वाहने सोडवून न नेल्यास त्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.