Pune Prime News : तुम्ही मुख्यमंत्री नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल की खालून उडेल ते आधी बघा. 31 डिसेंबरनंतर तुम्ही मुख्यमंत्रीपदी नसाल, मग तुम्ही कोणत्या बारमध्ये आहात ते चांगलेच कळेल. शिवसेनेचा बार गेल्या 50 वर्षापासून बाळासाहेब ठाकरेंपासून उडत आहे. भाजपने तुमचा बार कधीच उडवला आहे. तो आधी बघा, असा पलटवार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.
उद्धव ठाकरे ठाण्यातील मुंब्रा शाखेची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांना आपल्या लोकांनी शाखेपर्यंत येऊच दिलं नाही. ‘मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. नाही तर त्यांची औकात काय?
एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. नाही तर त्यांची औकात काय? राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसवले गेले आहेत. अशी जहरी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. शिवसेनेला तोडण्याचं भाजपचं जुनं स्वप्न आहे. मिंधे गटाला फोडूनही त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत नाहीये. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून काही लोक तोडून शिंदे सरकार बनवलं गेलं आहे. जाऊ द्या. आता आमच्याच लोकांना आमनेसामने आणून मराठी लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. असंही राऊत म्हणाले.
दिल्लीतील भाजपच्या चरणदासांनी मराठी माणसाची बेअब्रू केली
ते पुढे बोलताना म्हणाले, दिल्लीतील भाजपच्या चरणदासांनी महाराष्ट्राची, मराठी माणसाची बेअब्रू केली आहे. त्यांनी शिवसेनेला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. मुंबईमध्ये आम्ही हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा पोलिसांनी आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही संयमाने घेतलं. त्यामुळे नक्कीच संघर्ष टळला, असंही संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांची टोळी ही चोरांची गँग
एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना नाही, ही टोळी असून चोरांची गँग आहे. दोघांमध्ये भांडण लावण्यावर भाजपची नेहमीच नजर असते. दोघांमध्ये भांडणं लावणं हाच भाजपचा विचार आहे. जात, धर्माच्या नावावर पार्टी तोडण्याचा भाजपचा विचार आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत होती. आता हेच लोक भाजपचे प्रचारक आहे का? सत्ता, पैसा आणि उद्योग हाच भाजपचा विचार आहे. लोकांना गुलाम बनवणे हा भाजपचा विचार आहे, अशी टीका त्यांनी केली.