पुणे : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यूपीएससीने आयएएस पद रद्द केल्याने पूजा खेडकरने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी पूजा खेडकरने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकरने आधी अटकपूर्व जामीन मिळावा. यासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. अशामध्ये अटकेच्या भीतीने पूजा खेडकर पळून गेली असल्याची चर्चा सुरू आहे. पूजा खेडकरचा मोबाईल देखील नॉटरिचेबल लागत आहे. अशामध्ये पूजा खडेकरने दिल्ली हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. रविवारी रात्री पूजा खेडकरने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. यासाठी आज सकाळी कोर्टात प्रकरण मेंशन केलं जाण्याची शक्यता वर्तवली आहे. पूजा खेडकरने याचिकेमध्ये DOPT ला पक्षकार बनवले आहे. आता कोर्ट काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पूजा खेडकर यांचे विविध कारनामे समोर आल्यानंतर याची गंभीर दखल युपीएससीकडून घेण्यात आली होती. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. तसेच त्यांना परीक्षा देण्यास देखील बंदी घालण्यात आली होती. युपीएससीकडून पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. आता या विरोधात पूजा खेडकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पूजा खेडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.