Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मी फक्त ढकललं, मारहाण करण्याचा संबंधच नाही… पोलिसाच्या कानशिलात मारणाऱ्या आमदार सुनील कांबळेंचे स्पष्टीकरण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 5 January 2024, 14:30

पुणे : ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी तयार केलेल्या विशेष वॉर्डचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जितेंद्र सातव आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वाद निर्माण झाला. उद्घाटन पाटीवर नाव नसल्याने सुनील कांबळे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. या वादानंतर सुनील कांबळे यांनी मारहाण केलीच नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याबाबत भाजपा आमदार सुनील कांबळे म्हणाले की, मला त्याने तीनवेळा कोपरे मारले म्हणून मी पोलिसांना सांगितले की, हा कोण आहे? याकडे जरा बघा. तेव्हा पोलिसांनी त्याला मारलं, मी उलट त्याला सोडवायला गेलो होतो. मारहाणीच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत असूनही भाजप आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याचा इन्कार केला आहे. केवळ त्या कर्मचाऱ्याला बाजूला केलं, असं कांबळे यांनी म्हटलं आहे. राग प्रशासनावर होता, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं नाराज होतो, असं ते म्हणाले. मात्र मारहाण केली नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, कार्यक्रमानंतर मंचावरून खाली उतरताना आमदार कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, ला माहीत नाही, तो कोण होता? मी खाली उतरत असताना माझ्या शर्टाला धरून खेचल्यामुळे मी त्याला धक्का दिला. मी सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला नव्हता, गोळ्या घ्यायच्या होत्या त्यामुळे घाईगडबडीत बाहेर पडलो. कार्यालयात आल्यावर मला कळलं की, हे सगळं लाईव्ह सुरू झालेलं आहे. काय झालंय हेच मला कळालं नाही, मी कोणालाच मारहाण करण्याचा संबंधच नाही. ती कोण व्यक्ती आहे, मी त्याला ओळखत नाही, मी का मारू त्याला?” या कार्यक्रमात सरकारी कार्यक्रमात कोणताही प्रोटोकॉल पाळला गेला नव्हता. मंचावर कोण आले, याचा कोणालाही थांगपत्ता नव्हता. आमदारांना धक्काबुक्की होत होती, हे योग्य नाही.

 

मारहाण करायची असती, तर तिथे थांबलो असतो. मी बाजूला आलो, असंही कांबळे यांनी स्पष्ट केले. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांबाबत विचारल्यावर सुनील कांबळे म्हणाले की, “तुम्ही नीट पाहा, मी काही पाहिलेलं नाही, तुम्ही बघ खात्री करा. मारहाण करायची किंवा कानशीलात मारण्याची काय पोझिशन असते, ते नीट पाहा.” रुपाली चाकणकरांसोबत मी चालत होतो, त्यावेळी त्यांनी म्हटलं अरे आमदारांना पुढे जाऊ द्यात. तरी ते धक्का मारत होते, तिथे जे पोलीस होते त्यांनी बाजूला नेलं खाली त्यांचं जिन्यात काय झालं मला नाही माहिती, मी कार्यक्रमात निघून गेलो.”, असंही सुनील कांबळे म्हणाले. “राग प्रशासनावर काढायचा होता तर तो पत्रकारांशी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी काढण्याचा संबंध काय? मी कलेक्टरांशी बोललो, स्थानिक आमदार म्हणून कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं नाराजी होती.”, असंही ते म्हणाले.

पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र वॉर्डचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी कानशीलात लगावली. पुण्यातील ससुन रुग्णालयात हा प्रकार घडला. मात्र या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार म्हणून आपले नाव नसल्याचे सांगत आमदार सुनील कांबळे संतप्त झाले आणि त्यांनी सातव यांच्या कानशीलात लगावली. यानंतर सातव यांनी आपण या घटनेची माहिती अजित पवारांना देऊ, असे म्हटले आणि वाद चिघळला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

खराडीत जमीन देण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.