हडपसर : पुणे शहरापासून अगदी ४ किलोमीटर अंतरावर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या मांजरी फार्म (ता. हवेली) येथे प्रसिद्ध हॉटेल ‘रुबाब’ आहे. येथील ताजे व स्वादिष्ठ अन्नपदार्थांचा ग्राहक मोठ्या संख्येने आस्वाद घेत असतात. त्यामुळे हे हॉटेल ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले आहे.
‘रुबाब हॉटेल’ हे २०२१ मध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी दाखल झाले. अल्पावधीत हॉटेलने ग्राहकांना अन्नपदार्थासह उत्तम दर्जाची सेवा दिली आहे. हॉटेलमध्ये शाकाहारी व मांसाहारी असे दोन्हीही प्रकारचे जेवण मिळते. तसेच हे दोन्ही अन्नपदार्थ बनविण्यासाठी स्वतंत्र किचन आहेत. चिकन/मटन तंगडी, हांडी, मटण थाळी, चिकन थाळी व शाकाहारी पदार्थ अगदी वाजवी दरात आणि घरगुती मसाल्यांमध्ये बनविल्याचे मिळतात. इथले जेवण घरगुती पद्धतीचे असते. त्यामुळे जेवणानंतर कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे या हॉटेलला खवय्यांनी प्रथम पसंती दर्शविली आहे.
रुबाब फॅमिली रेस्टॉरंटमध्ये अस्सल चवीसोबतच, फ्रेश अम्बिएन्स मिळतील. इथले काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे की यासाठी खाद्यप्रेमी इथे आवर्जून येतात. जसे की मुर्ग मुसल्लम, क्रिस्पी फ्रॉन्स, आणि या सगळ्यामध्ये नॉनव्हेज लवर्ससाठीचा जास्तीत जास्त पसंतीस उतरलेला पदार्थ म्हणजे तंगडी कबाब. या ठिकाणी खाण्यासोबतच गाणी देखील अनुभवायला मिळतात. प्रत्येक विकेंडला येथे खास गाण्यांची पर्वणी असते. ज्यामध्ये तुम्ही मंत्रमुग्ध होऊन आपला विकेंड एन्जॉय करू शकता.
मुलांसाठी खेळण्यास खास प्ले गार्डन
‘हॉटेल रुबाब’मध्ये मुलांना खेळण्यासाठी खास प्ले गार्डन आहे. यामुळे मुलं आनंदाने खेळू व बागडू शकतात. आलेल्या नागरिकांसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. फ्रेश व चविष्ठ अन्नपदार्थ, स्वच्छ किचन आणि आदरातिथ्य जपणारा स्टाफ ही ‘रुबाब हॉटेल’ची ओळख झाली आहे.
दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यातील असंख्य नॉनव्हेज हॉटेल्स आहेत. हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व माहेरघर असल्याने इथं असंख्य पर्यटक येतात. याशिवाय शैक्षणिक हब, आय टी पार्क, विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या, लाखो विद्यार्थी कामगारवर्ग , अधिकाऱ्यांची रेलचेल इथे असते. त्यामुळे पुणे शहरात खात्रीशीर नॉनव्हेज जेवण कुठे मिळेल, याचा सर्वजण तपास करतात. तर, तुम्ही पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी ब्रुद्रुकजवळ असलेल्या हॉटेल रुबाबमध्ये नॉनव्हेज जेवणाचा नक्की आस्वाद घेऊ शकता.
वीकेंड म्हटलं की हॉटेल रुबाब
मागील दोन वर्षांपासून आम्ही कुटुंबासोबत हॉटेल रुबाबला येत आहोत. येथील अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर मन तृप्त होत आहे. वीकेंड म्हटलं की आम्हाला आमच्या डोळ्यासमोर हॉटेल रुबाब दिसते. येथील अन्नपदार्थांचे आम्ही सर्वजण फॅन झालो आहोत.
– नम्रता पाटील, सॉफ्टवेअर इंजिनियर, पुणे
दर्जेदार जेवणासह मिळते चांगली सेवा
या हॉटेलमध्ये उत्तम दर्जाच्या अन्नपदार्थाबरोबरच चांगली सेवा दिली जात आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी गार्डन असल्यामुळे कुटुंबासोबत येता येते. येथील गार्डनमध्ये मुले खेळल्याने खूप आनंदी होतात. त्यामुळे हे हॉटेल आमच्या पसंतीचे ठिकाण ठरले आहे.
– समीर केमकर, लोणी काळभोर, ता. हवेली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात खवय्ये
पुढारी, अधिकारी किंवा पदाधिकारी यांचा ज्याप्रकारे रुबाब असतो, त्याचप्रकारे आपल्या खवय्यांचाही रुबाब असावा. या संकल्पनेतून आम्ही तीन मित्रांनी एकत्र येऊन या हॉटेलची स्थापना केली आहे. या हॉटेलला उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट देऊन अन्नपदार्थाचा आस्वाद घेतला आहे. तसेच त्यांनी येथील अन्नपदार्थांचे भरभरून कौतुक केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक खवय्ये आमच्या हॉटेलला पुन्हा पुन्हा भेटी देत आहे. त्यामुळे आम्ही खवय्यांच्या विश्वासास नक्की पात्र ठरलो आहोत.
– अशोक शिंदे, मालक, हॉटेल रुबाब.