पुणे : पुण्यात ‘नाईट कल्चर’वर आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही काही हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत मध्य पार्टी आणि त्यामधून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे हे सर्व प्रकार अजूनही सुरू असल्याचे दिसत आहे.
पुणे शहरातील डेक्कन परिसरातील एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज या हॉटेलमध्ये शनिवारी (दि. २२) पहाटे पाच वाजेपर्यंत मध्य पार्टी जोरात सुरु होती. या मध्य पार्टीमध्ये काही तरुण स्वच्छतागृहात जाऊन ड्रग्स घेत होते. या प्रकारचा व्हिडिओ समाज माध्यमावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
शहरात अल्पवयीन तरुणांना दारू देण्यास बंदी असताना देखील या हॉटेलमध्ये अनेक अल्पवयीन मुलांना सर्रासपणे दारू दिल्याचे समोर आले आहे. कल्याणी नगर पोर्शे कर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी शहरातील सर्व पब, बार, रुफ टॉप हॉटेल वर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही हॉटेलमध्ये मद्य पार्टी आणि ड्रग्ज पार्ट्या जोरात सुरू असल्याने पोलीस नेमके करतायेत काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.