राजेंद्रकुमार शेळके
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त संत गाडगेबाबा स्वछता अभियानांतर्गत चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात ७ डिसेंबरला सालाबादप्रमाणे विविध संस्था आणि स्वयंसेवक यांनी स्वच्छता मोहीम राबवून योगदान दिले. अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा गौरव करण्यात आला.
उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल घन कचरा व्यवस्थापन खाते जी उत्तर विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व सहभागी सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक यांचा गौरव सोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा जी, उत्तर कार्यालयात सहायक आयुक्त प्रशांत सकपाळे यांच्या हस्ते झाला. घन कचरा व्यवस्थापन, जी उत्तर विभागाचे अधिकारी काझी यांनी विभागात स्वच्छतेचे प्रश्न निर्माण झाल्यास सदैव तत्पर आहोत, अशी ग्वाही दिली.
सहायक आयुक्त प्रशांत सकपाळे व घन कचरा व्यवस्थापन, जी उत्तर विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जितेंद्र कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.