सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजाराच्या ठिकाणी शेतमाल उघड लिलावाने विक्री, चोख वजनमाप व विक्रीनंतर शेतकऱ्यांना हिशोबपट्टी, त्वरीत रक्कम अदा केली जाते. तसेच शेतमाल विक्रीस अनुशंगिक सुविधा आणि अद्यावत मार्केट उभारणी यामुळे शेतकऱ्यांना सेवा-सुविधा देणेस ही बाजार समिती अग्रेसर असल्याचे मत बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहीत मोहोळकर व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केले आहे.
उपबाजार भिगवणमध्ये रविवार 21 जुलै रोजी ज्योतीबानगर येथील शेतकरी कालीदास भोसले यांची मका आडतीवर प्रति क्विंटल 3 हजार 500 रुपये या उच्चांकी दराने सचिन सातव यांनी खरेदी केली. मका प्रति क्विंटल 2 हजार 500 ते 3 हजार 500 पर्यंत विक्री झालेली आहे. तसेच समितीचे चालु सप्ताहात दैनंदिन डाळींब मार्केटमध्ये डाळींब विक्री किमान 20 ते 151 रुपये, पेरु 10 ते 71 रुपये, व कांदा मार्केट मध्येही कांदा विक्री प्रति क्विंटल 700 ते 3 हजार 250 या दराने विक्री झालेली आहे.
तर मासे (मासळी) मार्केट इंदापूर व भिगवण येथे दैनंदिन मार्केटमध्ये मासे (मासळी) ची उच्चांकी दरात विक्री होत असुन त्यास खरेदीसाठी आंध्रप्रदेश, कलकत्ता, कर्नाटक, तेलंगणा वगैरे राज्यातुन मागणी असुन मार्केटमध्ये खरेदीदार खरेदी चांगल्या दरात करीत आहेत.
बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मालास चांगला दर मिळावा या उद्देशाने मुख्य बाजार इंदापूर-अकलुज रोडलगतच्या बाजार आवारात धान्य सफाई यंत्र सुविधा उभारली असुन प्रति तास 5 मे. टन क्षमतेने धान्य सफाई केली जाते. तसेच इंदापूर बाजार समितीने शेतमाल तारण योजनाही बाजार समिती सुरु केलेली आहे. याचा फायदा शेतमाल बांधवांनी घ्यावा.
बाजार समितीने मुख्य बाजार इंदापूर मार्केट 60 मे. टन, शिवलिलानगर-इंदापूर अकलुज रोडलगत 80 मे. टन, उपबाजार भिगवण, निमगांव-केतकी व वालचंदनगर चे ठिकाणी 60 मे. टन व क्षमतेचे भुईकाटा (वे-ब्रिज) असुन त्यांची 24 तास सेवा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी बाजार समितीचे विविध योजना व उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहीत मोहोळकर, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केलेले आहे. यावेळी संचालक आमदार यशवंत माने देखील उपस्थित होते.