लोणी काळभोर, (पुणे) : येथील अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हेमंत सोपानराव हाडके यांची तर उपाध्यक्षपदी पांडुरंग गणपत काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यू. आर. थिटे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय प्रक्रिया पार पडली. यावेळी हेमंत हाडके व पांडुरंग काळभोर यांनी अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने दोन्ही पदांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यु. आर. थिटे यांनी केली.
संचालक मंडळ पुढीलप्रमाणे :- बाळासाहेब काळभोर, मुकुंद काळभोर, सचिन काळभोर, शालिवाहन काळभोर, जयेश हाडके, रमेश भोसले, संदीप भोसले, ज्ञानेश्वर कुंभार, कृष्णा पवार, विठ्ठल लांडगे, शामराव शेवाळे, प्राजक्ता भोसले, स्वाती हाडके यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली आहे.
दरम्यान, ३४ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेकडे १३.५० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने १२. ५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल २७ कोटी रुपये असून संस्थेच्या वतीने गेली सलग १५ वर्षे, १५ टक्के लाभांश वाटप करण्यात आले आहे. सन २०२३ – २८ कालावधी करता संस्थेच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यू. आर. थिटे यांनी दिली.