पुणे : बांबूसंदर्भातील सर्व प्रकारच्या माहितीसाठी व खरेदीसाठी महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाने १९२६ हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी या नंबरवर फोन करून आपली माहिती द्यावी आणि मदत मिळवावी, असे आवाहन बोर्डाने केले आहे.
भारत बांबू असोसिएशनच्या शिष्ठमंडळाला महाराष्ट्र बांबू डेव्हलोपमेंट बोर्डाचे कार्यकारी संचालक पी. कल्याणकुमार यांनी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन हेल्पलाइन नंबर दिवाळीनंतर कार्यान्वित करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळत १९२६ या वन विभागाच्या टोल फ्री नंबरवर बांबू संदर्भातील सर्व विषयासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
भारत बांबू असोसिएशन ही बांबू उत्पादक सेक्टरला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नावर काम करणारी संस्था आहे. महाराष्ट्र बांबू डेव्हलोपमेंट बोर्डाच्या सहकार्यामुळे असोसिएशनच्या प्रयत्नाला यश आलेल आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले.