पुणे : परतीच्या पावसाने पुणे शहराला जोरदार तडाखा दिला आहे. मागील दोन दिवसांपासून पुण्यात दुपारपासून जोरदार पाऊस पडत आहेत. परंतु, बुधवारी दुपारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
सध्या पावसाचा परतीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. देशातील राजस्थानसारख्या काही राज्यांतून मोसमी वारे परत गेले आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वदूर परतीचा पाऊस बरसत आहे. तसेच पुण्यातही गेल्या दोन दिवसांपासून जोरदार सरी बरसत आहे. बुधवारी दुपारपासूनच ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. दुपारी तीनच्या सुमारास संध्याकाळचे सात वाजल्यासारखा अंधार झाला होता. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस येण्यास सुरुवात झाली.
या पावसाची तीव्रता इतकी जास्त होती, वाहनचालकांना समोरचे नीट दिसतही नव्हते. त्यामुळे शहरातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, डेक्कन, नवी पेठ या भागांत ठिकठिकाणी पाणी साचले. रस्त्यांना अक्षशः ओढ्याचे रूप आले.
पुण्याला जोरदार पावसाने झोडपले; रस्त्यावर फक्त पाणीच पाणी#pune #PuneRains pic.twitter.com/svkVnqZ8Q0
— Yogesh Kangude (@Yogesh_Kangude) September 25, 2024