लोणावळा (पुणे) : शहरांमध्ये मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी (ता.12) तब्बल 106 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता.11) झालेल्या जोरदार पावसामुळे लोणावळा शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत.
या भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतुकही संथगतीने सुरु आहे. लोणावळ्यातील अनेक भागात पहिल्याच पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ त्या त्या भागातील समस्या सोडवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
लोणावळा शहरामध्ये यावर्षी आतापर्यंत 283 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी 4 हजार 518 (177.87 इंच) पावसाची नोंद झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मान्सून घाटमाथ्यावर सक्रिय झाला आहे. पावसाच्या आगमनाने उष्णतेने व उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.