व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धावती ट्रेन गाठण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला… मरण समोर ठाकलेले असतानाच चमत्कार; जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव!

Editorby Editor
Friday, 29 March 2024, 10:37

पुणे : धावत्या रेल्वेमध्ये जीव धोक्यात घालून चढणारे आणि स्टंटबाजी करून जीव गमावणारे महाभाग काही कमी नाहीत. पुणे रेल्वे स्थानकावर देखील असाच हादरवणारा प्रकार घडला. दुपारची वेळ. फलाटावरून वेगाने एक्स्प्रेस गाडी पुढे जात असतानाच धावत-पळत आलेला एक प्रवासी गाडी पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. त्याचवेळी अनर्थ घडला. धावताना तोल जाऊन तो फलाट आणि गाडीच्या मध्ये पडला. हे दृश्य पाहणाऱ्यांच्या जीवाचा ठोका चुकला. मरण डोळ्यांसमोर उभे ठाकलेले असतानाच चमत्कार घडला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता या प्रवाशाला वीजेच्या वेगाने ओढून बाहेर काढले अन् प्रवाशाचा जीव वाचला.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल असेच कथानक पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी अनुभवले. प्रवाशाचा जीव वाचविणाऱ्या जवानाचे नाव दिगंबर देसाई असे आहे. देसाई हे पुणे रेल्वे स्थानकावर बंदोबस्ताला आहेत. ते बुधवारी (ता. २७) नेहमीप्रमाणे स्थानकावर त्यांचे कर्तव्य पार पाडत होते. गुरूवारी (ता. २९) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर उद्यान एक्स्प्रेस येणार असल्याची उद्घोषणा झाली. गाडी फलाटावरून काही मिनिटांतच मार्गस्थ होत असतानाच एक प्रवासी धावत-पळत फलाटावर आला. त्याने धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो फलाट आणि गाडी यांच्यामध्ये पडला. हे दृश्य फलाटावरील शेकडो लोकांनी पाहिले आणि प्रत्येकाच्या काळजाचा ठोकाच चुकला.

दरम्यान, बंदोबस्तावर असलेल्या देसाई यांनी देखील हे दृश्य पाहिले. त्यांनी तत्काळ धाव घेत त्या प्रवाशाला वर ओढून घेतले. त्यामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला. देसाई यांनी प्रसंगावधान दाखवून कृती केली नसती तर त्या प्रवाशाचे प्राण गेले असते, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर दुसऱ्या गाडीत बसविण्यात आले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वेचे (पुणे) जनसंपर्क अधिकारी राम पॉल बडपग्गा म्हणाले की, प्रवाशांनी धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न करू नये. यातून प्रवासी स्वत:च्याच जिवाला धोका निर्माण करीत आहेत. प्रवाशांनी सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

11 वीत प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रवेशासाठीचे नवे वेळापत्रक जारी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Friday, 23 May 2025, 9:26

पुणे, सातारा, कोल्हापूरला पावसाने झोडपले, तज्ञांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचा दिला सल्ला

Friday, 23 May 2025, 9:05

राजेंद्र आणि सुशील हगवणे यांनी अटकेपूर्वी मटणावर मारला ताव, मित्रांसोबत मारल्या गप्पा

Friday, 23 May 2025, 8:50

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अखेर अटक; खेड्यात बसले होते लपून, 7 दिवसांपासून होते फरार

Friday, 23 May 2025, 7:54

आज ‘या’ राशींना मिळणार कष्टाचे फळ, नवीन संधी चालून येणार, कष्ट करणे सोडू नका

Friday, 23 May 2025, 7:41

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं : तब्बल एक लाख बहिणींचा लाभ होणार बंद

Thursday, 22 May 2025, 22:47
Next Post

'यशवंत' कारखाना चालू करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करणार; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.