पुणे : पुण्यातील वाघोली केसनंद रोड येथे कोणार्क ऑर्चिड सोसायटीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुधींद्रा बाबू मल्याळमार यांच्या फ्लॅटला आग लागल्याची माहिती पीएमआरडीएला मिळाली. यानंतर वाघोली अग्निशमन केंद्र येथील वॉटर टेंडर आणि ब्राउझर अशी दोन प्रकारची वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ४५ मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर 12 व्या मजल्यावरील आग आटोक्यात आणली. आग दूरवर पसरू न देता अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आटोक्यात आणली.
वाघोली केसनंद रोड येथे कोणार्क ऑर्चिड सोसायटीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती पीएमआरडीएला मिळाली. यानंतर वाघोली अग्निशमन केंद्र येथील वॉटर टेंडर आणि ब्राउझर अशी दोन प्रकारची वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून अथक प्रयत्नानंतर मजल्यावरील आग आटोक्यात आणली. मात्र फ्लॅटमधील साहित्य जळून खाक झालं आहे.