लोणी काळभोर, (पुणे) : हवेली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यु. आर. थिटे यांनी दिली.
पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी नुकतीच पार पडली. यामध्ये ५२ सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिक्षक नेते राजेश काळभोर व हवेली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर यांनी संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी अर्ज माघारी घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ३७ सभासदांनी अर्ज माघारी घेतले.
बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे :-
सोपान शेलार, मारुती हिंगणे, दिगंबर सुपेकर, वैशाली वाडकर, अश्विनी ठोंबरे/पानसंबळ, गणेश जाधव, प्रकाश चौधरी, रोहिदास डिंबळे, प्रवीण झांबरे, विजय काळे, समीर काकडे, संदीप गायकवाड, रंगनाथ औताडे, बबन सताव, सुरेश कटके अशी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांची नावे आहेत.
सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन शिक्षक नेते राजेश काळभोर, हवेली शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर, जयवंत मोहिते, गणेश मेमाणे, विश्वनाथ कोकाटे, अशोक मराठे, बापू कसबे, अहमद खान, संजय खिराडे, प्रवीण खिराडे, शिवाजी जाधव, दादा डोके, किशोर कांबळे, अतुल सोनवणे, सोमनाथ शिंदे, सागर शिंदे, यांच्यासह अनेक शिक्षक बांधवानी केले.
तसेच हनुमंत जाधव, सुनील साखरे, सुनील चोरघे, कृष्णा वावरे आदी उपस्थित होते. दरम्यान, संस्थेची स्थापना १९२३ साली झाली असून सभासदांची संख्या हि ७०० आहे. भागभांडवल १२.५० कोटी असून वार्षिक उलाढाल हि ३३ कोटीहून अधिक आहे. कर्ज पुरवठा २५ लाख रुपये असून व्याजदर हा ९ टक्के आहे. ऑडिट वर्ग सतत ‘अ’ आहे.