पुणे प्राईम न्यूज डेस्क: पुण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर लोणी काळभोरच्या कुशीत सागर हनुमंत तुपे यांचं एक भलंमोठं थ्री स्टार हॉटेल आहे, त्याचं नाव ‘हॉटेल मॅजेस्टिक’. हे हॉटेल तब्बल दीड एकरामध्ये पसरले असून, या हॉटेलची सुरुवात 2017 मध्ये करण्यात आली. तेव्हापासून ते आजतागायत हे हॉटेल खवय्यांच्या खास सेवेत आहे.
हॉटेल मॅजेस्टिकचं नाव अल्पवधीतच मोठं झालं. इथं शुद्ध तेलात सर्वच पदार्थ बनवले जातात. जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला पदार्थ खाल्ल्याने अपाय होऊ नये. तसेच कोणतेही कलर्स इसेन्स अथवा सोडा बेकिंग पावडर यांसारख्या गोष्टींचा वापर केला जात नाही. त्यामुळे पदार्थ चविष्ट व आरोग्यासाठी उत्तम ठरतात.
नेमकी स्पेशालिटी काय?
या हॉटेलमध्ये काळा रस्सा, मटण, रान चिकन, रान मटण, मटका दम बिर्याणी व चिकन हैदराबाद बिर्याणी, अथेंतिक पंजाबी फूड व चायनीज फूड तसेच नाश्त्यासाठी साउथ इंडियन ही त्यांची स्पेशालिटीच आहे.
घरगुती अन् शाकाहारीची लिस्टच…
या हॉटेलमध्ये शाकाहारी लोकांसाठी पिठलं, भाकरी-चपाती, ठेचा, मेथी, काळवंग, भेंडी, वरण-भात हे सर्व पदार्थ घरगुती पद्धतीने बनविले जातात. त्याचबरोबर जिलेबी गुलाबजामून नॅचरल रबडी व फळांचे ज्यूस दिले जातात.
का जावं या हॉटेलमध्ये?
या हॉटेलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हॉटेलचे किचन हे सर्वात स्वच्छ आहे व या ठिकाणी काम करणारे अनुभवी कामगार आहेत. अनुभवी शेफ, वेटर्स व कॅप्टन आहेत. दीड एकरामध्ये भव्य हॉटेल उभारले आहे. ‘ग्राहक हेच दैवत’ या हेतूने या हॉटेलमध्ये सेवा सुरू आहे. तसेच या हॉटेलमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे व वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्थाही आहे.
हॉटेल नेमकं कुठंय?
‘हॉटेल मॅजेस्टिक’, थेऊर फाट्याजवळ, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, लोणी काळभोर.