दीपक खिलारे
Harshwardhan Patil | इंदापूर : इंदापूर तालुक्यामध्ये अचानकपणे वादळ, गारपीट आणि वीज कोसळून झालेल्या नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे करावे. व नुकसानग्रस्तांना लवकर मदत जाहीर करून नूकसान भरपाई द्यावी. अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस शनिवारी (ता.८) झाला होता. या पावसात मोठ्या कडकडासह आवाज होवून वीज झाडावर पडली होती. इंदापूर नजीक मोरे मळा येथे बाळासाहेब मोरे यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर मोठ्या आवाजासह वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतला होता.
वीज पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण….
वीज पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (ता.९) मोरे मळा वस्तीवर येऊन परिसराची पाहणी केली. तसेच उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’ इंदापूर तालुक्यात अचानकपणे काल सर्व भागात चक्रीवादळ व गारासह पाऊस झाला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जनावरांचे नुकसान झाले आहे. फळबाग व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारला मागणी केली आहे की, ताबडतोब पंचनामे करा व झालेल्या नुकसानीची मदत मिळावी. सणसर भागात कालवा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे त्याचीही पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांशी संपर्क केला असुन त्यांनी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळेल.’ असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Indapur News : इंदापूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले ;आकाशदर्शन
Indapur News | इंदापूरच्या आमदारांकडून जनतेची दिशाभूल : अँड.शरद जामदार
Indapur News : इंदापूरच्या विद्यमान आमदारांना युवकांचा तळतळाट लागेल; अँड शरद जामदार