दीपक खिलारे
इंदापूर : Harsh Vardhan Patil News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने विधिमंडळात सादर केलेला सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व समाजाला व घटकांना न्याय देण्यात आला आहे. विधिमंडळाच्या इतिहासातील उत्कृष्ट असा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात भाजपचे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harsh Vardhan Patil News) यांनी कौतुक (praise) केले.
(HarshVardhan Patil News)
इंदापूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत रविवारी (ता.12) ते बोलत होते.
पाटील म्हणाले, ”शिवसेना-भाजप डबल इंजिन सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पातून समाजातील प्रत्येक घटका प्रती असलेली बांधिलकी दिसून येत आहे. राज्यातील जनतेच्या आलेल्या 40 हजार सूचनांचा या अर्थसंकल्पात विचार करून, अर्थमंत्री फडणवीस यांनी अतिशय कल्पकतेने अर्थसंकल्प मांडला आहे.”
नमो शेतकरी महासन्मान निधी जाहीर करून केंद्र सरकारच्या प्रतीवर्षी-प्रतिशेतकरी 6 हजार रुपयांत, राज्य सरकार आणखी 6 हजार रुपये भर घालणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून सहभाग घेता येणार आहे. तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन व शिवभजन थाळी योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
धनगर समाजासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून शेळी-मेंढी पालना करीता 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शेळी व मेंढी सहकारी विकास महामंडळाची स्थापना करून मुख्यालय अहमदनगर येथे असणार आहे.तसेच धनगर समाजाच्या उन्नतीकरीता आदिवासी उपयोजनेच्या धर्तीवर 22 योजनेसाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ”पुणे रिंग रोडचे भूसंपादन, मुंबई पुणे दृतगती मार्गावर खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंकचे बांधकाम करणे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एशियन डेव्हलपमेंट बँक, हायब्रीड अँन्युईटी व इतर नियमित योजनातून 18 हजार कि.मी. लांबीचे रस्ते सुधारणा आणि 4 हजार 500 कि.मी. लांबीचे जिल्हा व ग्रामीण मार्गाची कामे तसेच मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद शेत रस्ते योजनेत सुधारणा करून नवीन योजना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.”
लाकडी-लिंबोडी योजनेसाठी 450 कोटीची तरतूद, इंदापूर तालुक्यातील रस्ते व पुलांच्या कामासाठी 55 कोटी रुपये रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, तावशी पुलासाठी 17 कोटींचा निधी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारने दिल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील हरघर हरजल योजनेसाठी सुमारे 800 कोटी रुपयांचा निधी आल्याची माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी दिली. यावेळी भाजपचे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.