दीपक खिलारे
इंदापूर Harshvardhan Patil : इंदापूर तालुक्यात, शहरात केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध होत आहे. (Harshvardhan Patil) असे असताना तालुक्यातील विरोधकांकडून मात्र स्वतः ची जाहिरात करुन ते काम मीच केले असे दाखवण्याचा नवा ट्रेण्ड तालुक्यात निर्माण झाला असल्याचा टोला भाजपाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी विरोधकांचे न घेता लगावला. (Harshvardhan Patil)
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीच्या बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख यांना मार्गदर्शन
इंदापूर येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात रविवारी (दि.30 ) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीच्या बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भाजपच्या सबका साथ, सबका विकास या अजेंड्याप्रमाणे शहरातील विविध सामाजिक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची योजना, राज्यातील पहिले योगभवन, सरस्वतीनगर भागात गरिबांसाठी उभारण्यात आलेली घरकुल योजना, रस्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील भवन आदी प्रकारची विकासकामे आपल्या सरकारच्या माध्यमातून झाली आहेत. काही कामे सुरु आहेत. असे असताना विरोधकांकडून केल्या जात जाहिरातबाजीचे श्रेय घेण्याच्या वृत्तीचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी धन्यवाद मानले.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात शंभर टक्के अंडरग्राउंड ड्रेनेज तसेच जिल्हा नियोजन मंडळातून कोट्यावधी रुपयांचा निधी शहराच्या उपलब्ध केला जाणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
तसेच नगरपरिषदेकडून आकारण्यात आलेल्या शास्ती व व्याजावर लवकरच मंत्रिमंडळात निर्णय घेऊन समाधानकारक निर्णय घेतला जाईल असा दिलासा हर्षवर्धन पाटील यांनी शहरवासीयांना दिला.
तालुक्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.
दरम्यान माजी हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख यांचेकडून त्या -त्या भागातील कामांचा आढावा घेतला. या कार्यक्रमास भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Harshvardhan Patil | इंदापूर तालुक्यातील सर्वधर्मसमभाव राज्यात आदर्शवत – हर्षवर्धन पाटील
Harshvardhan Patil : गिरीशभाऊ पुणेकरांच्या कायम स्मरणात राहतील – हर्षवर्धन पाटील