दीपक खिलारे
Harshvardhan Patil | इंदापूर : तालुक्यातील सर्व समाज एकमेकांशी बंधुत्वाच्या नात्याने गुण्यागोविंदाने राहतो. हा सर्वधर्मसमभाव राज्यात आदर्शवत आहे. तसेच ही परंपरा कायम पुढे कायम चालत राहणार आहे. असा विश्वास भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
शुक्रवारी (दि.21) बावडा ता. इंदापूर येथील जामा मशीदमध्ये आयोजित इफ्तार पार्टीमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पाटील यांनी मुस्लिम बांधवांची संवाद साधला. यावेळी पाटील यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना शीरखुर्मा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
पाटील पुढे म्हणाले, ‘तालुक्यातील लुमेवाडी येथील फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबांचा दर्गाह राज्यासह परराज्यातही प्रसिद्ध आहे. तेथील दर्गाहच्या विकासकामांबाबत आपण प्रारंभ पासून सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे. बावडा गावात पिढ्यान पिढ्या बंधूभावाने आपण एकत्र राहत आहोत. एकमेकांच्या सुखदुःखात कायम एकत्र असतो.’ हे नातं आगामी पिढ्यातही कायम राहणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
शोक घोगरे, राजवर्धन पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मनोज पाटील, विकास पाटील, सुभाष गायकवाड, उमेश सूर्यवंशी, हरिभाऊ बागल, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
मुस्लिम समाजाच्या सार्वजनिक विकास कामांसाठी 50 लाखाचा निधी..
जिल्हा नियोजन विकास मंडळातून बावडा येथे मुस्लिम समाजाच्या सार्वजनिक विकास कामांसाठी 50 लाखाचा निधी देण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.