दीपक खिलारे
इंदापूर : Harshvardhan Patil News – इंदापूर तालुक्यातील 14 विविध विकास कामांसाठी शिवसेना-भाजप सरकारने ग्रामविकास विभागाअंतर्गत 2 कोटी 3 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी गुरुवारी (दि.6) दिली. सदर निधी दिल्याबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. (Harshvardhan Patil)
गिरीश महाजन यांचे मानले आभार
ग्राम विकास विभागाने निधी मंजूर केलेली विकास कामे पुढीलप्रमाणे:-
१) भिगवण येथे ग्रामसचिवालय इमारत बांधणे (रु.25 लाख),
२) निरगुडे येथे महिला अस्मिता भवन बांधणे (रु.20 लाख),
३) अकोले येथे भगवान बाबा भक्त निवास बांधणे (रु.20 लाख),
४) पोंधवडी येथे भोसले वस्ती काळुबाई मंदिर सभागृह बांधणे (रु.7 लाख),
५) बावडा येथे काशी विश्वेश्वर मंदिर सभागृह बांधणे (रु.10 लाख),
६) शिरसाटवाडी येथे श्रीराम मंदिर सभागृह बांधणे (रु.15 लाख),
७) शिरसाटवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण करणे (रु.15 लाख),
८) उद्धट येथे दत्त मंदिर सभागृह बांधणे (रु.20 लाख),
९) अंथर्णे -शिंदेमळा शिरसाई मंदिर सभागृह बांधणे (रु.7 लाख),
१०) अंथर्णे- काळू पांडुरंग वाघ वस्ती काळुबाई मंदिर सभागृह बांधणे (रु.7 लाख),
११) चांडगाव येथे तुळजाभवानी मंदिर सभागृह बांधणे (रु.7 लाख),
१२) खोरोची येथे गावठाण महादेव मंदिर सभागृह बांधणे (रु.10 लाख),
१३) मानकरवाडी येथे भैरवनाथ मंदिर सभागृह बांधणे (रु.30 लाख),
१४) बावडा गावठाण अंतर्गत रस्ते काँक्रीटकरण करणे (रु.30 लाख).
सदरचा निधी दिलेबद्दल शिवसेना-भाजप सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Harshvardhan Patil : भाजपच्या नेतृत्वाखाली देश, राज्य प्रगतीपथावर- हर्षवर्धन पाटील
Harshvardhan Patil News : अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना न्याय : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
Harshvardhan Patil News : अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना न्याय : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील