Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदानाचा निर्णय स्वागतार्ह : हर्षवर्धन पाटील

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 22 December 2023, 21:49
Harshavardhan patil on milk subsidy in indapur pune

इंदापूर : महायुती सरकारने गाईच्या दुधास प्रति लिटरला 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महायुती सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे शुक्रवारी (दि.22) सांगितले. तसेच दूधगंगा दुध उत्पादक सहकारी संघाची नियोजनबद्धरित्या प्रगतीपथाकडे वेगाने वाटचाल सुरू असल्याबद्दल गौरोद्गारही त्यांनी काढले.

इंदापूर येथे दूधगंगा सहकारी संघाच्या कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी अनुदान वाढीसाठी महायुती सरकारकडे पाठपुरावा केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांचा दूधगंगा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान करत आभार व्यक्त केले.

यावेळी दूध संघाचे अध्यक्ष उत्तम जाधव, उपाध्यक्ष विक्रम कोरटकर, दूध संघाचे संचालक राजवर्धन पाटील, विलास वाघमोडे, शहाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे दूध उत्पादन शेतकऱ्यांना 1 जानेवारीपासून गाईच्या दुधाला प्रतिलिटर किमान 34 रुपये इतका दर मिळणार आहे. दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार गायीच्या 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ दुधाला रु.29 दर सहकारी दूध संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्यानंतर सरकारच्या वतीने प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत.

दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादन शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने मी व दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक राजवर्धन पाटील आम्ही दुग्ध व्यवसायमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची मुंबईत 6 नोव्हेंबरला भेट घेतली व निवेदन दिले. त्यानंतर विखे पाटील यांनी दुग्ध खात्याच्या अधिकाऱ्यांची अनुदानासंदर्भात बैठक घेतली. तसेच 20 नोव्हेंबर रोजी पुन्हा भेट घेऊन शेतकऱ्यांना रु. 7 प्रति लिटर याप्रमाणे अनुदान द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर विखे पाटील यांनी 21 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर दूध दरवाढीवर चर्चा करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक घेतली. राज्यभरातून अनेक संघटनांनी गाईच्या दूध खरेदीच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये दूध व्यवसायाचा सिंहाचा वाटा आहे. मी अकलूजच्या शिवामृत संघाचा संचालक, पुणे जिल्हा दूध संघाचा (कात्रज) संचालक म्हणून काम करत असताना दुग्ध व्यवसायवाढीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने मांडणी केली. दूध धंद्यामध्ये सुशिक्षित युवक, महिला, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. दूधगंगा दूध संघामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायाला स्थिरता प्राप्त झाली. मध्यंतरी दूध संघ अडचणीत आला होता. मात्र, आता अमुलशी करार केल्याने दूध संघ वेगाने प्रगती करत आहे.

शेतकऱ्यांना दहा दिवसाला पेमेंट केली जात असून, महिन्याला 12 कोटी रुपयांचे दूध पेमेंट शेतकऱ्यांना दिले जात आहे. दूध संघाचे संकलन प्रतिदिनी 1 लाख लिटर झाले आहे, असे गौरवोद्गार ही हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

तालुक्याच्या विकासासाठी नेतृत्वाकडे दूरदृष्टी लागते. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात तालुक्यात एकही सहकारी संस्था निघाली नाही. अथवा सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी एकही काम झालेले नाही, अशी खंतही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

दूधगंगा संघाकडून हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांचा सत्कार

राज्य शासनाकडे गेली दोन महिने दुधाला अनुदान द्यावे. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्याने यश झाल्याबद्दल दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाच्या वतीने यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व दूधगंगा दूध संघाचे संचालक राजवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महायुती सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post
Bajrang Punia leaves his Padma Shri Award outside PM Modi's residence

VIDEO : बजरंग पुनियाने फूटपाथवर ठेवला ‘पद्मश्री’, नरेंद्र मोदींना भेटू न दिल्याने पंतप्रधानांच्या घराबाहेर ठेवलं पदक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.