दीपक खिलारे
इंदापूर : काझड (ता.इंदापूर) येथे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा जोड प्रकल्पाच्या बोगद्यात मृत्यूमुखी पडलेल्या रतिलाल नरुटे व अनिल नरुटे या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची गुरुवारी (दि.23) भेट घेऊन सांत्वन केले.
इंदापूर तालुक्यातील काझड हद्दीत नीरा-भीमा जोड प्रकल्पाच्या बोगद्यात बुधवारी (दि.22 ) सायंकाळी पडून दुर्दैवाने या 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा या शेतकऱ्यांचे मृतदेह सापडले. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी या शेतकऱ्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, काझडचे माजी सरपंच सुनील शिवाजी पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी सांत्वन केले.