बारामती : डॉक्टर होण्यासाठी आधीपासून खुप हुशार असावे लागते, त्यासाठी प्रत्येक परीक्षेत चांगलेच गुण मिळावे लागतात हा आपल्या सगळ्यांचा समज आहे. दहावीला अवघे 78 टक्के गुण मिळविलेल्या हर्षद संतोष कायगुडे या विध्यार्थ्याने आपल्या परिश्रमाच्या जोरावर हा समज खोटा ठरवला आहे. त्याने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या नीटच्या प्रवेश परीक्षेत 720 पैकी तब्बल 675 गुण मिळविले आहेत.
हर्षद हा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गणेशवाडी गावचा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी. मात्र शिक्षणासाठी तो बारामतीत आला. दहावीनंतर त्याने 1729 आचार्य अॅकॅडमीतून नीट परीक्षेसाठी तयारी करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी नीटसाठी पहिला प्रयत्न केला त्यावेळी त्याला 470 गुण मिळाले होते. पण याने पुन्हा एकदा प्रयत्न करायचे ठरवले. पहिल्या वेळी झालेल्या चुका दुरुस्त केल्या. एनसीईआरटीच्याच अभ्यासावर आणि सरावावर भर दिला.
यामध्ये त्याला आचार्यच्या अनुभवी प्राध्यापकांचेही उत्तम सहकार्य मिळाले. आता या वर्षी झालेल्या परीक्षेत त्याला 675 गुण मिळाले आहे. दुसऱ्या प्रयत्नात त्याचे 205 गुण वाढलेले आहेत. हर्षलने यासाठी 1729 आचार्य अॅकॅडमीचे प्राध्यापक आणि व्यवस्थापनाचेही आभार मानले आहेत. 1729 आचार्य अॅकॅडमीच्या अशा अनेक विद्यार्थ्यांनी नीट, जेईई आणि एनडीएच्या परीक्षांमध्ये उत्तम यश मिळविले आहे.
बारामती, इंदापूर, पुणे येथील वाकड आणि रहाटणी या चार शाखांतून अॅकॅडमीचे कामकाम सुरु असून प्रत्येक वर्षी विद्यार्थी आणि पालकांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे.
नीट किंवा जेईई सारख्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले तर उत्तम अशा शैक्षणिक संस्थांत प्रवेश मिळणे सोपे होते. या क्षेत्रातील अशा संस्था प्रामुख्याने शासकीयच आहेत. त्यामुळे कमी खर्चात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळून पुढील करियरची वाटचाल सोपी होते. त्यामुळे हे वाढलेले 205 गुण हर्षदसाठी अत्यंत मोलाचे आहेत. आता कोणत्याही नामवंत संस्थेत शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचा त्याचा मार्ग सुकर झाला आहे.