पुणे : रायगडच्या हरिहरेश्वरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हरिहरेश्वर येथे शनिवारी मध्यरात्री पुण्यातील मद्यधुंद पर्यटकांचा रूमच्या किंमतीसंदर्भात लॉज मालकासोबत भांडण झाले. त्याच रागातून या पर्यटकांनी लॉज मालकाच्या बहिणीच्या अंगावरुन गाडी नेऊन तिला स्कॉर्पिओखाली चिरडलं. ज्योती यांना रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ज्योती धामणस्कर (वय-34) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरुन कोकणात श्री दक्षिणकाशी क्षेत्र असलेल्या हरिहरेश्वर परिसरात फिरण्यासाठी आलेले पुण्यातील पर्यटक यांनी हरेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक अभी धामणस्कर त्यांच्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी रूमसंदर्भात विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याशी रूमच्या किंमतीसंदर्भात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. त्यानंतर हे पर्यटक तिथून निघून जाताना अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर यांना स्कॉर्पिओ गाडीखाली चिरडलं
याप्रकरणी आकाश उपटकर, नीरज उपटकर, आकाश गावडे, आशिष सोनावणे, अनिल माज, विकी सिंग, सलीम नागुर, सचिन जमादार, आदिल शेख, इराप्पा धोतरे, सचिन टिल्लू अशी आरोपींची नावे आहेत. तसेच या प्रकरणी तीन जणांना तब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.