पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं राबवण्यात येणाऱ्या या विशेष अभियानानिमित्त ग्रामीण भागातील नागरिक उत्सुक आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं ‘हर घर तिरंगा’ हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. तरी या अभियानाच्या तारखांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
या अभियानाच्या बदललेल्या तारखा 13 ते 15 ऑगस्ट असून या दरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायतींमधून तिरंगा विकत घेऊन या काळात आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असं आवाहन पुणे जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे.
देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी 15 ऑगस्ट देशातील सर्व शासकीय, खासगी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असते. बाजारपेठा, उद्योगही बंद असतात. पण यावर्षीचा स्वातंत्र्य दिन त्याला अपवाद ठरणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने यावर्षी स्वातंत्र्य दिनादिवशी असलेली सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त केंद्र सरकारकडून देशभरात मागील वर्षभरापासून विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी अनेक राज्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.