दीपक खिलारे
इंदापूर : बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, पुणे जिल्हा व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्यावतीने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, महाराष्ट्र राज्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथे (ता. १९) शिवजयंतीच्या मुहूर्तावर विशेष शिबीर होणार असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा ग्रामीण कक्ष प्रमुख सीमा कल्याणकर यांनी दिली.
ज्या दिव्यांग बांधवांना हात किंवा पाय नाही, अशा दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात व पाय रोपण डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे, असे सीमा कल्याणकर यांनी सांगितले.
या शिबिराची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहचवावी. आपल्या सहकार्यामुळे आपल्या भागातील हात आणि पाय नसलेल्या लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होईल. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत ही बातमी पोहचवावी, असे आवाहन सीमा कल्याणकर यांनी केले आहे.
यासाठी पुढील आरोग्यदात्यांशी संपर्क साधावा. भूषण सुर्वे ८४४६६६०३३१, सीमा प्रशांत कल्याणकर ७७९६६८८२१४, सागर आवटे ९९७०८४८४५४, अॅड. आनंद केकाण, ९९६०२५०४००, सोमनाथ लांडगे ९५०३५२११११, सुरेश मिसाळ ९८९०८१२२४७ यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.