Half Ticket | पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी महिला सन्मान योजना जाहीर केली. या योजनेनुसार एसटीने बसने प्रवास करणाऱ्या सरसकट महिलांसाठी अर्ध्या तिकीटच ( Half Ticket )आकारले जाते. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून पुणे विभागातील तब्बल 1 लाख 31 हजार महिलांनी केला एसटीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. यावरु ही योजना सुसाट धावत असून यामुळे एसटीला अच्छे दिन आले आहेत.
प्रवासात सवलत दिल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढताना आहे. फक्त तीनच दिवसांत पुणे विभागात 1 लाख 31 हजार महिलांनी प्रवास केला असून, यातून सुमारे 35 लाख रुपयांचे उत्पन्न एसटी खात्याला प्राप्त झाले आहे. तिकिटावरची उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार असल्याने एसटी आता फायद्यात येणार आहे.
या योजनेची अमंलबजावणी 17 मार्चपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी पुणे विभागात 19 हजार 186 महिलांनी प्रवास केला. 18 मार्चला 46 हजार 228 आणि 19 मार्चला 65 हजार 414 महिलांनी प्रवास केला.
सोशल मिडिया मीमचा धिंगाणा…
सरकारने ही योजना लागू करताच एसटी बस मध्ये बसण्यासाठी महिलांची झुंबड उडीली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर बस मध्ये एवढी गर्दी झाली त्यामुळे कंडक्टर बस सीट वर चढून तिकीट काढत असल्याचाही व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह दिसून येत आहे. ही योजना नक्की सुसाट वेगाने धावणार हे सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Accident | चांदणी चौक परिसरात खाजगी बस १५ फूट खाली कोसळली; बसमध्ये 35 प्रवासी
MSRTC News |राज्यातील महिलांसाठी खुशखबर! आजपासून महिलांना एस टी बस प्रवासात ५० टक्के सवलत