लोणी काळभोर, (पुणे) : रथसप्तमीपर्यंत सुवासिनींसाठी हळदी कुंकू करण्याची प्रथा असून, ती आजही जपली जात आहे. त्यानुसार लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) मकरसंक्रांती निमित्त महिलांकरिता हळदीकुंकू, तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला लोणी काळभोरसह परिसरातील ५०० व त्यापेक्षा अधिक महिलांनी उपस्थिती दर्शवून एक वेगळीच रंगत भरली. वेगवेगळ्या समाजातील महिलांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपली. दैनंदिन संसारिक जबाबदारीतून मुक्त होणारा उखाण्यांचा कार्यक्रम सर्व उपस्थित स्त्रियांना मनमुराद हसवून गेला.
या कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ३५० महिलांना चेष्म्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती सरपंच माधुरी काळभोर यांनी दिली.
यावेळी सरपंच माधुरी काळभोर, माजी सरपंच ललिता विलासआण्णा काळभोर, साधना सहकारी बँकेच्या संचालिका वंदना काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, ग्रामपंचायत सदस्या ललिता काळभोर, सविता लांडगे, संगीता काळभोर, कदमवाकवस्तीच्या माजी ग्रामपंचायत सदस्य राणी बडदे, सविता जगताप, तसेच आदी महिला उपस्थित होत्या.