युनूस तांबोळी
शिरूर : प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक,
मुघल जन संघारक, श्रीमान योगी, योगिराज, बुद्धिवंत, कीर्तिवंत, कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्म धुरंधर, श्रीमंत.. श्रीमंत..
श्रीमंत.., महाराजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की जय !.. जय भवानी। .. जय शिवाजी!…
हर हर महादेव चा जयघोष, पोवाडा, झुलवा पाळणा बाल शिवाजी च्या गितावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेला ग्रामस्थांनी दिलेली
दाद. यातच कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथील विद्याधाम माध्यमिक विद्यालयात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व भक्तीशक्ती शिल्पाचे शिवजयंती निमित्त अनावरण करण्यात आले.
या शाळेच्या प्रवेशव्दारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मानस प्राचार्य अनिल शिंदे यांनी व्यक्त केला. त्यातून माजी विद्यार्थी यांनी पूढाकार घेतला. या शिल्पाचे उदघाटन रोहिदास ढगे वअ र्चना ढगे, सागर दंडवते व नाजूका दंडवते,
संतोष उकिर्डे व स्नेहल उकिर्डे ह्या देणगीदार दाम्पत्यांच्या हस्ते झाला.
यावेळी मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बबनदादा शिंदे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष
गंगाधर पुंडे, उपसरपंच सोपान पुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, स्वर्गीय फक्कडराव शिंदे व स्वर्गीय माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब शिंदे मामा सांस्कृतिक कलामंचाच्या
नूतनीकरणासाठी १९९४/९५ व २००४/०५ च्या दहावीच्या तुकडीने एक लाख एक हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. हा धनादेश गंगाधर पुंडे,सचिव सुदाम तळोले व प्राचार्य अनिल शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.श्रुती उर्किर्डे व निलम इचके यांचे यावेळी शिवचरीत्रावर भाषण झाले. यावेळी शिवजयंतीनिम्मित विद्यालयाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यावेळी योगेश पुंडे,संदीप तांबे,विजय घोलप,दीपक पुंडे,सचिव सुदाम तळोले,संचालक सदाशिव पुंडे,शहाजी दळवी,रोहिदास ढगे,बाबुराव दळवी,अशोक उकिर्डे,अमोल रामदास पुंडे,रामदास कुलट,गणेश पुंडे,खैरवाडीचे उपसरपंच नंदकुमार गोडसे, धर्माजी लांघे,अजित गोरडे,विश्वनाथ नाणेकर,मारुती थोपटे,वर्षा करंजकर,अनिल साकोरेआदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले,सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी व आभार विनोद शिंदे यांनी केले.