पुणे: रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हडपसर-हिसार, दौंड-अजमेर आणि सोलापूर-अजमेर दरम्यानच्या विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. हडपसर-हिसार (ट्रेन क्र. ०४७२४) साप्ताहिक विशेष ट्रेनच्या तीन फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. २ ते १६ डिसेंबर दरम्यान गाडीचा कालावधी वाढविला आहे. प्रत्येक सोमवारी ही गाडी सुटणार आहे. तर हिसार-हडपसर (ट्रेन क्र. ०४७२३) साप्ताहिक विशेष ट्रेन १ ते १५ डिसेंबर दरम्यान कालावधी वाढविला असून, प्रत्येक रविवारी ही गाडी सुटणार आहे.
दौंड-अजमेर (ट्रेन क्र. ०९६२६) साप्ताहिक विशेष ट्रेन २९ नोव्हेंबरपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती. तिचा कालावधी १३ डिसेंबरपर्यंत कालावधी वाढविण्यात आला आहे. या काळात दर शुक्रवारी दोन फेऱ्या होणार आहेत. तर अजमेर-दौंड (ट्रेन क्र. ०९६२५) साप्ताहिक विशेष ट्रेने १२ डिसेंबरपर्यंत आता धावणार आहेत. या काळात ट्रेनच्या दर गुरुवारी दोन फेऱ्या होणार आहेत. तसेच सोलापूर-अजमेर (ट्रेन क्र. ०९६२८) साप्ताहिक विशेष ट्रेनचा कालावधी १२ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.