पुणे : “गेली पाच वर्षे 24 तास 12 महिने जनतेसाठी मी नेहमी उपलब्ध राहिलो आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. माझ्यात आणि माझ्या जनतेत कोणतीच भिंत ठेवली नाही. म्हणूनच माझ्या हडपसरची जनता माझ्या पाठीशी आहे. त्यांच्या पाठिंब्यानेच मी पुन्हा एका विधानभवनात जाणार आहे.” असे प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी केले.
येथे आयोजित पदयात्रेत ते नागरिकांशी थेट संवाद साधत होते. “हडपसरच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या भागाचा भूमिपुत्र, इथल्या मातीशी एकरूप झालेला हक्काचा माणूस म्हणून मी सदैव तत्पर आहे. आजवर तुमच्या न्याय्य हक्काचे प्रश्न देखील प्रसंगी मी रोखठोक भूमिका घेत विधिमंडळात मांडले आहेत. तुमच्या प्रतिसादातून मला त्याची पोचपावती मिळते आहे. 20 नोव्हेंबर रोजी माझी माणसे अनुक्रमांक 1 वरील माझ्या घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून मला पुन्हा एकदा विकासात्मक कामांसाठी निवडतील.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हडपसर गाव, मगरपट्टा, गाडीतळ, उन्नती नगर, सातववाडी, गोंधळेनगर या भागातून ही पदयात्रा व दुचाकी यात्रा झाली. यावेळी पुणे महानगर पालिकेच्या माजी महापौर वैशालीताई बनकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, माझी नगरसेविका उज्वलाताई जंगले, माजी नगरसेविका विजयाताई कापरे, नलिनीताई मोरे, सुनील बनकर, सोमनाथ तुपे, विजय मोर, डॉ. शंतनू जगदाळे, अभिमन्यू भानगिरे, नितीन होले, सागर राजे भोसले, कलेश्वर घुले, योगेश सूर्यवंशी, विठ्ठल विचारे, सतीश शिंदे, दत्ता जगताप, सतीश भिसे, शालिनी जगताप, अश्विनी वाघ, रोहिणी क्षीरसागर, स्नेहल कांबळे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.