हडपसर(पुणे): हडपसर पोलिसांनी महादेवनगर येथील एका दुकानावर छापा टाकून ४.०८ लाख रुपये किमतीचे ५१० बनावट पोलो शर्ट जप्त केले आहेत. दुकानाचे मालक प्रीतम सुदाम गावडे यांच्यावर बनावट उत्पादने विकल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. USPAL ग्लोबल लायसन्सिंगचेअधिकारी मंगेश जगन्नाथ देशमुख यांनी दुकानात बनावट पोलो शर्ट विक्री होत असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दुकानावर छापा टाकला आणि बनावट उत्पादने जप्त केली.
हडपसर पोलिसांनी प्रीतम सुदाम गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहेत. पीएसआय सत्यवान गेंड यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकात कॉन्स्टेबल कांबळे, गोसावी, राऊत, केसकर आणि महामुनी यांचा समावेश होता. रॉयल मेन्स कलेक्शन या दुकानावर छापा टाकला असता त्यात ४ लाख ८ हजार रुपयांचे ५१० शर्ट बनावट असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ते सर्व जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे पोलीस हवालदार कांबळे अधिक तपास करीत आहेत. बनावट उत्पादने विकणाऱ्यांवर पोलिस कडक कारवाई करत आहेत.