Hadapsar | वाघोली, (पुणे) : रिक्षामध्ये विसरलेली सुमारे पन्नास हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग संबंधित प्रवाशांना प्रामाणिकपणे परत करून हडपसर येथील रिक्षाचालकाने आदर्श ठेवला आहे.
सुनील शिंदे (रा. हडपसर) असे रिक्षाचालकाचे नाव असून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील शिंदे यांनी वाघोली परिसरातून प्रवासी घेऊन शनिवार वाडा येथे सोडले. यावेळी प्रवासी असलेले दिलीप सदावते दापत्त्य घरात मुलीचे लग्न असल्यामुळे बस्ता करण्यासाठी घाई-गडबडीमध्ये रिक्षामध्ये पैशाची बॅग विसरले. जेव्हा सुनील शिंदे यांच्या ते लक्षात आले की आपल्या रिक्षामध्ये कोणाची तरी बॅग विसरली. तेव्हा त्यानी कसलाही विचार न करता बॅग लष्कर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी स्वाती सोनवणे यांच्या स्वाधीन केली.
रिक्षावाल्याचा प्रामाणिकपणा बघून ज्यांची बॅग आहे, त्यांना पोलीस कर्मचारी सोनावणे व रिक्षा चालक शिंदे यांनी बॅगेतील बँकेच्या पासबुकवर असलेल्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क केला. परंतु त्या दापत्यांनी फोन काही उचलला नाही. थोड्या वेळाने शिंदे यांना फोन आला व त्यांनी बॅग सुखरूप असल्यची माहिती पोलिसांना दिली. या दाम्पत्याला रिक्षात घेऊन ज्या ठिकाणी स्वाती सोनवणे ड्युटीवर होत्या त्या ठिकाणी घेऊन गेले.
दरम्यान, महिला पोलीस कर्मचारी सोनवणे यांनी दिलीप सदावते या दांपत्यासमोर ती बॅग उघडली, बॅग मध्ये महत्वाची कागदपत्रे, ५० हजार रोख आहे याची खात्री झाली. खात्री झाल्यानंतर रिक्षावाले सुनिल शिंदे आणि पोलीस कर्मचारी स्वाती सोनावणे यांचे दाम्पत्याने मनापासून आभार मानले. त्या दाम्पत्याने सुनील शिंदे या रिक्षावाल्या चा प्रामाणिकपणा बघून त्यांना थोडे रोख बक्षीस ही दिले. अजून माणुसकी जिवंत आहे. असे आनंद उदगार काढले व आभार मानले. सुनील शिंदे रिक्षाचालक यांचे पुणे रिक्षा मालक – चालक संघटनेच्या वतीने मोठया प्रमाणात कौतुक होत आहे.