(Hadapsar News) हडपसर, (पुणे) : गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर टाळण्यासाठी मुलींसाठी एचपीव्हीची लस व तीस वर्षांपुढील स्त्रियांनी गर्भपिशवीच्या तोंडाची कॅन्सर तपासणी करून घ्यावी. कॅन्सरचे निदान झाल्यास घाबरून जाऊ नये. वेळेत औषधोपचार घेतल्यास रुग्ण लवकर बरा होतो असे मत प्रयास संस्थेच्या डॉ. तृप्ती धारपोवार यांनी केले.
कॅन्सरचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन….!
हडपसर (Hadapsar News) शिवसमर्थ संस्थेने ब्रम्हांड संस्थान व प्रयास संस्थेच्या विशेष सहकार्याने स्तनाचा व गर्भाशयाच्या कॅन्सरचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. तृप्ती धारपोवार बोलत होत्या.
यावेळी ब्रह्मांड संस्थांनचे चारूहास रेडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिन देशपांडे, सावी संस्थेच्या विद्या होडे,सुनंदा देशमुख, शिबिराच्या आयोजक शिवसमर्थच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे व उपाध्यक्षा आदिरा देशमुख उपस्थित होते. या शिबिरामध्ये ४० महिलांच्या गर्भाशय कॅन्सरची व ३२ महिलांची स्तनाच्या कॅन्सरची तपासणी केली.
यापुढे बोलताना धारपोवार म्हणाल्या, “विशेषता बाळाला स्तनपान केलेल्या मातांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण कमी आढळते. आरोग्याबाबत काही शंका असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपले आरोग्य आपल्या स्वतःच्या हाती असून, महिलांनी स्वतःसाठी वेळ द्यावा. स्तनाच्या व गर्भाशयाच्या कॅन्सरचे योग्य वेळी निदान होणे गरजेचे आहे. अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे, उपचाराद्वारे अनेक रुग्ण आता निरोगी जीवन व्यतीत करीत आहेत” प्रास्ताविक मनीषा वाघमारे यांनी केले तर आभार विद्या होडे व आदिरा देशमुख यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Hadapsar News : गावाचा विकास होण्यासाठी युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा ; अनिल रांजणे