पुणे : रेल्वे प्रशासनाने हडपसर ते लातूर दरम्यान दिवाळी सण, तसेच छठ पूजेनिमित्त सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून चार दिवस अशा एकूण २० गाड्या धावणार आहेत. यामध्ये हडपसर-लातूर सुपरफास्ट (ट्रेन क्रमांक ०१४३०) स्पेशल २५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान आठवड्यातून चार दिवस धावणार असून, एकूण १० फेऱ्या करण्यात येणार आहेत. आठवड्यातील दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी हडपसरहून गाडी सुटणार असून, त्याच दिवशी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी लातूरला पोहोचणार आहे.
तर लातूर-हडपसर सुपरफास्ट (ट्रेन क्रमांक ०१४२९) स्पेशल २५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान आठवड्यातून चार दिवस धावणार असून, एकूण १० फेऱ्या करण्यात येतील. आठवड्यातील दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी लातूरहून गाडी सुटणार असून, त्याच दिवशी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी हडपसरला पोहोचणार आहे. या गाडीला हरंगुळ, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, जेऊर, दौंड जंक्शन आदी स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.