Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar Fraud Scheme: प्रशासनातील अनेक बडे अधिकारी अडकले समर्थच्या दामदुप्पटीच्या मोहमायेत ? काळ्या पैशाचा भांडाफोड होईल म्हणून ‘आळीमिळी गुपचिळी’

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 October 2025, 19:08
Hadapsar Fraud Scheme: Many senior officials in the administration were caught in the trap of Samarth's double-dealing? 'Alimili Gupchili' so that the black money scandal will be exposed

Photo-Social Media

लोणी काळभोर : शेतीमाल एक्स्पोर्ट करण्याच्या (Hadapsar Fraud Scheme) नावाखाली हडपसर येथील पठ्ठ्याने मागील दोन वर्षापूर्वी (Pune News) एक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील हजारो शेतकऱ्यांची 4 हजार कोटींहून अधिक रुपयांची बेकायदा माया गोळा केली आहे. याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार झाल्याने संबंधित महाठगाने दुसऱ्या कंपनीच्या नावावर जुना दामदुपटीचा खेळ सुरू केला आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रशासनाने या संस्थेची साधी चौकशीसुद्धा केली नसल्याची धक्कादायक बाब माहिती आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे प्रशासन कारवाई का करत नाही याचे कारण आज समोर आले आहे. ते असे की, प्रशासनातील काही बड्या अधिकाऱ्यांनीसुद्धा टेबलाखालून मिळणारी मोहमाया दामदुप्पट करण्याच्या आमिषापोटी या संस्थेत गुंतवली आहे आणि जर या संस्थेवर कारवाई झाली तर आपला सुद्धा भांडाफोड होईल आणि आपली नावे व काळा पैसा समोर येईल. त्यामुळे ठगावर कारवाई करण्यापेक्षा ‘आळीमिळी गुपचिळी’ ची भूमिका संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

हडपसर येथील एका महाठगाने स्वत: कृषी आयुक्त असल्याची माहिती सर्वत्र पसरवली होती. त्यानंतर त्याने “एक्स्पोर्टमध्ये बक्कळ पैसा मिळतो, तुम्हाला प्रतिमाह 10 टक्के परतावा देतो” असे आमिष दाखवून संबंधित पठ्ठ्याने पुणे, नगर, नाशिक, सोलापूरसह बाराहून अधिक जिल्ह्यातील गुंतवणूकदरांची संख्या 4 हजाराहून अधिक असून, वरील गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम 4 हजार 800 कोटी रुपयांहून अधिक आहे. असे त्याने स्वत: एका व्हिडीओ क्लीपद्वारे जाहीर केले आहे.

 

संबधित पठ्ठ्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनातील मोठमोठे अधिकारी, राजकीय नेते यांच्याशी ओळख असून थेट संबंध असल्याचे व्हिडीओच्या माध्यामातून दाखविले आहे. या झगमगाटीला सर्वसामान्य गुंतवणूकदार भुलले असून त्यांनी या बोगस संस्थेमध्ये हजारो कोटींची अवैध गुंतवणूक करून घेतली आहे. तसेच संस्थेला अतिरिक्त भांडवलाची गरज असल्याचे सांगून प्रशासनातील अधिकारी व व्यावसायिकांनादेखील जादा परताव्याचे गाजर दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पडले आहे. संबधित ठगाच्या फतव्याला अधिकारीवर्ग देखील फसला आहे. परंतु, त्यांनी डोके चालवून टेबलाखालून मिळणारी माया यात गुंतवली असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान,संबंधित संस्थेची तक्रार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे या संस्थेच्या चौकशीचे आदेश कधीही येऊ शकतात. त्यामुळे आपणही या प्रकरणात अडकणार असल्याने अनेक अधिकाऱ्यांची देखील घाबरगुंडी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी अधिकाऱ्यांनी ‘तेरी भि चूप मेरी भि चुप’ अशी भूमिका स्वीकारली आहे.

दोन महिन्यांपासून परतावा बंद
हडपसर येथील पठ्ठ्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वात प्रथम 10 टक्के परताव्याचे आमिष दाखविले आहे. मात्र आता गुंतवणुकीचा वेग कमी होऊन परताव्याचा मागणी वाढली आहे. त्यामुळे या ठगाने इतर घोटाळयाप्रमाणे चाल ढकल पुढे केली आहे. गुंतवणूकदारांना मागील दोन महिन्यांपासून परतावा मिळालेला नाही. गुंतवणूकदरांचे वारंवार फोन येत असल्याने फोन नंबर बदलला आहे आणि जर या क्रमांकावर जवळच्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसरा कोणाचा फोन आला तर तो उचलला जात नाही. थोड्या वेळाने फोन करतो असा मेसेज पाठविला जातो. परंतु, पुन्हा परत कधीच फोन येत नाही.

संबंधित महाठग आजारी असल्याचे कारण देत असल्याने गूंतवणूकदार हवालदिल
” पुणे प्राईम न्यूज”ने या फसव्या स्कीमबाबत आवाज उठवल्याने नव्याने होणारी फसवणूक व गुंतवणूक मोठ्या प्रमाणात थांबली आहे. त्यामुळे महाठगाचे आर्थिक गणित कोलमडल्याने तीन तेरा वाजले आहेत. त्यातच काही नागरिक गुंतवणूक केलेली मुद्दल परत मागू लागल्याने महाठग आजारपणाचे सोंग घेऊन आजारी पडला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04

असली-नकली तृतीयपंथीयांच्या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; शासनाने ओळखपत्र देण्याची गरज

Monday, 22 June 2026, 17:50

सासवड पोलिसांची धडक कारवाई! ऑस्करवाडीतील बेकायदा हुक्का बारवर छापा, दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 17:46

भाड्याच्या घरात दोन थेरड्यांचं धक्कादायक कृत्य! तरुणींना फूस लावून आणायचे अन् शरीराचे लचके तोडायचे; शेजारचे तरुणीला वाचवायला धावले अन्…

Monday, 22 June 2026, 17:04

पुणे सोलापूर महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

Monday, 22 June 2026, 16:37
Next Post
Nilesh Ghaywal: Big news! Minister of State for Home Yogesh Kadam signs arms license for Nilesh Ghaywal's brother

Nilesh Ghaywal: मोठी बातमी! गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने निलेश घायवळच्या सख्ख्या भावाला शस्त्र परवाना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.