बापू मुळीक / सासवड : पुरंदर हा दुष्काळी भाग असल्याने गुंजवणीचे पाणी शेतीच्या भागांमध्ये फिरवणार. पंधरा वर्षांपूर्वी गुंजवणी धरणाचे पाणी देण्याचे आश्वासन ठरल्याने, पाटचारीद्वारे पाणी देण्यासाठी जो शब्द दिला होता. ते आश्वासन दोन वर्षात पूर्ण करणार, असा विश्वास आमदार विजय शिवतारे यांनी पुरंदर वाशीकरांना दिला आहे.
2009 साली गुंजवणी धरणाचे काम 80 टक्के झाले होते. त्याला स्वत: शिवतारे यांनी गती देऊन दुष्काळी पुरंदर भागातील शेतकऱ्यांनी चांगलाच पाठिंबा दिला. मोर्चे, आंदोलन, उपोषण करून विविध मार्गांनी गुंजवणीचे काम पूर्ण करून शिवतारे यांनी अखेर ते काम पूर्ण करून घेतले. 2014 साली धरणाचे काम पूर्ण झाले होते .बंद पाईपलाईन मधून पाणीपुरवठा होईल, असे सांगण्यात आले होते. त्यावेळी स्वत: शिवतारे जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री होते. त्या काळात पाणी वितरण सुरू करणे प्राप्त होते.
परंतु काही सदस्यांनी न्यायालयात धाव घेऊन अडथळा करून, शेवटच्या टप्प्यात ते काम थांबवले. यासाठी पाणी वितरण करण्यासाठी शिवतारे यावेळी अयशस्वी झाले. 2022 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जवळचे मित्र असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून गुंजवणी धरणासह सात ते आठ मुद्द्यावर काम करण्याचे आश्वासन पूर्ण करून घेतल्याने त्यांना एका कामाला चांगली गती देता आली.
शेवटी शिवतारे यांनी चांगलीच बाजी मारली.1307 कोटीची योजना पाच वर्षात न केल्यामुळे ती योजना 1982 कोटीवर गेली. यात सरकारचा 800 कोटीचा फटका बसला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बसून पुन्हा एकदा पाईपलाईनचे काम चालू केले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यामुळेच विजय शिवतारे यांनी गुंजवणीचे पाणी पुरंदर मधील लाभ क्षेत्रात दोन वर्षात फिरवणार असा उल्लेख केला आहे.