सासवड : पुरंदर तालुक्यात गोरगरीब जनतेला आत्तापर्यंत भेडसावणारे गुंजवणीचे पाणी, विमानतळ, आंतरराष्ट्रीय बाजार अशा विविध योजना मिळाल्या नाहीत. त्या मिळवून देणे हे माझे मुख्य ध्येय असेल. हे काम पुढील सहा महिन्यात पूर्ण करणार असल्याचे मत विजय शिवतारे यांनी व्यक्त केले. ते पुरंदर येथे युवा सेना मेळाव्यात बोलत होते.
सासवड (ता. पुरंदर ) येथील आचार्य अत्रे सभागृह या ठिकाणी युवासेना कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला .यावेळी विनस शिवतारे, मंदार गिरमे, नितीन कुंजीर, पूर्वेस सरनाईक, कपिल भाडळे यांनी आपले मनोगत परखडपणे व्यक्त केले.
पुढे बोलताना शिवतारे म्हणाले की, पंधरा वर्षांपूर्वी निवडणूक लढवताना सर्वसामान्य युवक, यांच्या पाठबळावरच मी आत्तापर्यंत आमदार, मंत्री झालो आहे. आणि यापुढील काळामध्ये सुद्धा पुरंदर हवेली मधील सर्व युवकांच्या हातात ही येणारी विधानसभा निवडणूक दिली आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.
यावेळी विजय शिवतारे, पूर्वेस सरनाईक, किरण साळी तसेच युवक सेना पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मंदार गिरमे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन कुंजीर यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश मुळीक यांनी मानले.