पुणे : हिंदू धर्म आणि संस्कृतीत साडे तीन मुहुर्तास खूपच महत्व दिले जाते. या साडे तीन मुहुर्तापैंकी गुढीपाडवा (Gudi Padwa 2023 )हा सण एक मानला जातो. हा मुहुर्त साधत अनेकजण नवीन खरेदील पसंती देत असतात. याच दरम्यान वाहनखरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मुहूर्त साधत, यंदा पुणेकरांनी तब्बल 11 हजार 964 वाहनांची खरेदी केली आहे. यात सर्वाधिक 8 हजार 11 दुचाकी पुणेकरांनी खरेदी केली आहेत. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा अधिक असून खरेदीचा टाॅप गियर टाकला आहे.
शहरात किती वाहनांची खरेदी
वाहन खरेदी करताना याची नोंद स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात येते. शहरात किती वाहनांची खरेदी झाली. याची माहिती कार्यालयाने दिली आहे. नवीन वस्तू खरेदीला शुभ मुहुर्त साधला जातो. त्यामुळे आपल्या रितीनुसार येणाऱ्या सणांच्या दिवशी खरेदीची लगबग सुरु असते. पाडव्याच्या पूर्वसंध्येला नवीन वाहन खरेदी करत घरी घेऊन जाण्याला अनेकांनी पसंती
दिली. सकाळी गुडी उभारताना नवीन वाहनाची पूजा करण्याला पसंती दिली. त्यामुळे मोठ्या शोरूम बाहेर नागरिकांची मंगळवारी गर्दी पाहायला मिळाली.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे याचा परिणाम वाहन खरेदीवर होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र वाहन खरेदीनंतर नोंदणी ऑनलाईन असल्याने काहीही परिणाम होणार नाही, असे कार्यालयाने जाहीर केले होते. परंतू, सरकारी कर्मचार्यांच्या संपामुळे यंदा वाहनांची नोंदणी करताना आरटीओ अधिकार्यांची धावपळ उडाली.
7 ते 21 मार्च 2023 दरम्यान झालेली वाहनांची नोंदणी
वाहनप्रकार नोंद झालेली वाहनसंख्या
मोटार सायकल – 8011
कार – 2933
गुड्स – 389
रिक्षा – 267
बस – 21
एकूण वाहने – 11964/-
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : काँग्रेस केवळ घोषणा करणार पक्ष; उदयनराजे भोसले
Pune Fraud News | पुणे : विजय वर्ल्डच्या मालकावर फसवणूकीचा गुन्हा; १८ लाखांच्या फसवणूकीचा आरोप;!