अजित जगताप
सातारा : दुष्काळी भागातील खटाव तालुक्यात वडूज नगरीतील रानमळा तथा माधव नगरमध्ये पेरू उत्पादन घेतले जाते. बागायतदार शेतकरी मोहन काळे- पाटील व त्यांची पत्नी मीनल काळे- पाटील यांनी आपल्या बागायतदार शेतामध्ये गुजरात राज्यातील येथील दर्जेदार व चविष्ट अशा जारवी पीक घेत आहेत.
पहिल्या वर्षी दहा किलो, दुसऱ्या वर्षी अठरा किलो व तिसऱ्या वर्षी तीस किलो तयार पेरू अशी एका रोपट्याला पेरू येत आहेत. बागायतदार असलेले शेतकरी मोहनराव काळे पाटील यांनी जीवामृत, जिवाणू खतांच्या मदतीने शेती करीत आहेत. जमिनीच्या घटक तपासणी करून माती परीक्षण करून (माधव नगर) रानमळा येथे पाचशे पेरू रोपाची लागवड केली आहे. अशा कठीण हवामानामुळे अल्प म्हणजे पन्नास पेरूची रोपे नष्ट झाली असली तरी साडेचारशे पेरूची रोपे दिमाखात उभी आहेत.
अकरा बाय सात प्रमाणे पेरूची लागण करून एक एकर मध्ये ही पेरूची बाग फुलवली आहे. अठरा महिन्यात पूर्ण पेरू तयार होत आहे. सध्या निर्यात बंदी असल्यामुळे मुंबई बाजार समितीमध्ये अर्धा ते एक किलो वजनाचा पेरू विक्रीसाठी पाठवली जात आहे.
आधुनिक यंत्र सामुग्री इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेतली आणि त्या आधारे पेरूची बाग उभी केली आहे. स्वच्छता तसेच कोणतेही औषध अथवा अनैसर्गिक फवारणी न करता सेंद्रिय खत वापरूनच हे पेरू तयार केलेले आहेत. त्यांचे चिरंजीव बीटेक असून त्यांचाही या पेरू बागेत हातभर लागत आहे.
बदलत्या वातावरणामुळे जमिनीच्या घटक आम्लदारी अल्कधारी होत असून माती परीक्षण करून शेतकऱ्यांनी एक उत्पादन घ्यावे रोगराई पासून संरक्षण करण्यासाठी स्वतः शेतात फेरफटका मारावा तरच आपल्याला शेती उत्पन्न वाढल्याचे दिसून येईल. असा अनुभव शेतकरी मोहनराव काळे पाटील यांनी सांगितला.
माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव सामाजिक कार्यकर्ते इम्रान बागवान तसेच सिद्धेश्वर कुरोलीचे माजी सरपंच राजू फडतरे व मान्यवरांनी त्यांच्या पेरूच्या बागेला भेट देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
कृषी विभागाचे काही अधिकारी हे या बागेला भेट देऊन शेतकऱ्यांनी केलेल्या स्वयं परिश्रमाचे कौतुक करीत आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील कृषी मंत्री मुख्य कृषी सचिव, कार्यकारी संचालक व वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्येक विभागात तश्या सूचना करून दोन महिन्यातून एकदा आढावा घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.