लोणी काळभोर : पंधरावा वित्त आयोग, जन नागरी सुविधा, ग्राम निधी व स्वच्छ भारत मिशन या योजनेंतर्गत कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीला विविध विकास कामांसाठी शासनाकडून 2 कोटी 58 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विविध विकास कामांचे भुमीपुजन नुकतेच करण्यात आले आहे. अशी माहिती सरपंच हरेश गोठे यांनी दिली आहे.
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील विविध विकास कामांचे भुमीपुजन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदिप कंद यांच्या शुभहस्ते शनिवारी (ता. 14) करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलिप वाल्हेकर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा पुनम चौधरी, उद्योजक जी.बी. चौधरी, सागर चौधरी, माजी सरपंच सचिन तुपे, उपसरपंच आशाताई कुंजीर, संग्राम कोतवाल, बापूसाहेब घुले, गोरख घुले सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास कामांची नावे व कंसात उपलब्ध निधी
कुंजीरवाडी येथील वार्ड क्र ३ येथे भूमिगत गटर लाईन (थेऊरफाटा) करणे (1400500), पाण्याची टाकी जवळ (बारव) परसबाग पाण्याची पाईप लाईन करणे (250499), कुंजीरवाडी ग्रा.प. हद्दीत वार्ड क्र ६ येथे पाणी गळती थांबवणे, यासाठी जुना कॅनॉल लगत भिंत बांधणे (359000), ग्रामपंचायत पाणी पुरवठा मोटार व मालमत्तेस सौर उर्जा प्लांट बसविणे (545996), सांडपाणी व्यवस्थापन करणे (1474320), गावांतर्गत भूमिगत गटर लाईन करणे (200000)
पाणीपुरवठा सौर प्रकल्प करणे (800000), ग्रामपंचायत कार्यालय व शासकीय इमारतीसाठी पाणीपुरवठा व्यवस्था करणे (500000), पाणंद रस्ता सुधारणा करणे (785134), ग्रामपंचायत कार्यालय येथे फर्निचर करणे (674273), आज वस्तीमध्ये बंदिस्त गटर लाईन करणे (659762), अंगणवाडीतील पाणीपुरवठ्यासाठी सोलार प्रोजेक्ट उभारणे (200000), जिल्हा परिषद शाळेतील पाणी पुरवठ्यासाठी सोलार प्रोजेक्ट करणे (200000)
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पार्णी पुरवठ्यासाठी सोलर प्रोजेक्ट उभारणे (474325), ग्रामपंचायत शौचालय दुरुस्ती करणे (325135), ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आवश्यक सुधारणा / दुरुस्ती करणे / सुविधा करणे (400000), कुंजीरवाडी अंतर्गत रस्ते सुधारणा करणे ( 1024271), स्मशानभूमी सुधारणा व सुशोभिकरण (100000), कुंजीरवाडी येथील गाढवे मळा ते लोणी काळभोर कडे जाणारा (रस्ता 25 लक्ष) कुंजीरवाडी येथे सोलापूर रोड ते धुमाळ मळा रस्ता करणे (40 लक्ष), कुंजीरवाडी धुमाळ मळा, महादेव धुमाळ जुने घर ते लोणी काळभोर (5 लक्ष)
कुंजीरवाडी येथील आळंदी रस्ता ते महादेव मंदिर रस्ता करणे (7 लक्ष), कुंजीरवाडी येथील आळंदी रोड ते महादेव मंदिर कुंजीरवाडी गाव रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लक्ष), ग्रामपंचायत कुंजीरवाडी शेजारील रस्ता तयार करणे (5 लक्ष), कुंजीरवाडी गाढवे मळा ते लोणी शिव रस्ता करणे (10 लक्ष), बाजार मैदान ते जुना कॅनॉल रस्ता तयार करणे (5 लक्ष), कुंजीरवाडी धुमाळ ते लोणी शिव रस्ता रस्ता करणे (15 लक्ष), कुंजीरवाडी येथे वार्ड क्र. १ येथे सिमेंट रस्ता व भूमिगत गटर करणे (15 लक्ष), वार्ड नंबर ४ उर्वरित रस्ता करणे (230666), जि.प. शाळा शौचालय बांधणे (342000), अठवडे बाजार येथे सिमेंट कंक्रीट करणे (15 लक्ष)