बापू मुळीक
सासवड : पुरंदर येथे रविवारी (दि.1 सप्टेंबर) रोजी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील शेकडो हून अधिक बेरोजगार तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. यासाठी भारतात आणि परदेशात आखाती देशांमध्ये सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. टेक्निकल, नॉन टेक्निकल, इंजिनिअर, डिप्लोमा व मजूर व तत्सम सर्व प्रकारच्या नोकरीच्या संधी या उपलब्ध आहेत, अशी माहिती जालिंदर कामठे यांनी दिली.
पुरंदर येथील मोहिनी हॉटेल या ठिकाणी रोजगार नोकरी मेळावा महोत्सवानिमित्त वसंतदादा पाटील प्रतिष्ठान मार्फत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जालिंदर कामठे बोलत होते. ते म्हणाले 50 कंपन्यासाठी नोकरी भरती करणार आहे. यासाठी शेकडो जागांसाठी कायमस्वरूपी नोकऱ्या आहेत. तर आपले शिक्षण व कामाच्या अनुभवांची माहिती घेऊन 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 3 पर्यंत गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय हिवरे येथे पुरंदर मधील युवक युवतीने माहिती घेऊन यावे, असे आवाहन केले आहे.