Goutami Patil |पुणे : राज्याच्या राजकारणात विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि सांस्कृतीक कार्यक्रमात गौतमी पाटील या दोघांचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात आता चक्क अजित पवारच गौतमीच्या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याची चर्चा खेड तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे आता चांगलीच रंगत येणार असल्याचे दिसून येणार आहे.
खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवस कार्यक्रमानिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य जल्लोष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपस्थिती लावणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्याचवेळी खेड तालुक्यातील मोई येथे नृत्यांगना गौतमी पाटीलचाही कार्यक्रम आहे. मात्र, अजित पवार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
अजित पवार आणि गौतमी पाटील हे दोघेही असणार एकत्र ?
गावागावात सध्या गौमती पाटीलच्या कार्यक्रमांची क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी पुण्यात गौतमी पाटील हिला खडसावले होते. मात्र, त्यानंतर गौतमी हिने अजितदादांची दिलगिरी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर बारामतीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला होता. आज खेड तालुक्यात अजित पवार आणि गौतमी पाटील हे दोघेही असणार आहेत. मात्र गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अजितदादा हजेरी लावणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजगुरुनगर येथे ‘महाराष्ट्राचा हास्य जल्लोष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी खेड तालुक्यातील मोई येथे गौतमी पाटीलचा देखील कार्यक्रम होणार आहे. दोन्ही कार्यक्रम एकच वेळी असल्याने अजितदादा गौतमीचा कार्यक्रमाला हजेरी लावतात का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल ओळखले जातात. गौतमी पाटील हीचा हा व्यवसाय असल्याचे देखील अजित पवार यांनी अनेकदा म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या कुठल्याच कार्यकर्त्याने गौतमी पाटील हीचा कार्यक्रम घेऊ नये, अशी भूमिका घेतल्याचे देखील पहायला मिळाले होते. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार आणि गौतमी पाटील एकाच कार्यक्रमाला येणार आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
राखी कोण बांधणार ? त्याने चक्क डेटिंग अॅपवर शोधल्या दोन बहिणी…!
Solapur News : यल्लम्मा देवीच्या यात्रेहून परतणा-या कारला ट्रकची धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू!