-बापू मुळीक
सासवड : पुरंदर मधील शासकीय अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रतीची कामे ही ठेकेदाराकडून करून घ्यावीत. कामांमध्ये कोणताही निष्काळजीपणा, हलगर्जीपणा चालणार नाही. सबंधित अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची सुद्धा अजिबात गय केली जाणार नाही, असे प्रतिपादन पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर ) येथील पुरंदर पंचायत समितीच्या सभागृहात सर्व अधिकारी यांच्या सर्व विभागाचा आढावा बैठकीचे आयोजन करून एक प्रकारचा आढावा आमदार यांनी घेतला. पंचायत समितीच्या सर्व विभागांना माझ्याकडून सहकार्य राहील, कोणत्याही विभागांना कामांमध्ये अडचण आल्यास, माझ्याशी संपर्क करावा. त्यातून स्वत: मी नक्कीच मार्ग काढील, असे सुद्धा बैठकीत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी पंकज शेळके, आरोग्य अधिकारी विक्रम काळे, पाणीपुरवठा अभियंता सचिन घुबे, बांधकाम उप अभियंता संजय गिते, छोटे पाटबंधारे विभागाचे ओंकार शेरकर, बाकी पुरंदर पंचायत समितीचे राहिलेले अधिकारी वर्ग, तालुका अध्यक्ष हरिभाऊ लोळे, माजी सदस्य दत्ता काळे, समीर जाधव, भुषण ताकवले, एडवोकेट नितीन कुंजीर, सागर करवंदे, प्रकाश शिंदे, योगेश खुटवड आदी उपस्थित होते.