पुणे : शिवाजीनगर आगारातून २९ जानेवारी रोजी अष्टविनायक दर्शन अशी साधी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही बस शिवाजीनगर आगार, वाकडेवाडी येथून सकाळी ७ वाजता सुटून ओझर येथील भक्तीनिवास येथे मुक्काम करणार आहे. ही बस ३० जानेवारी रोजी रात्री ११ पर्यंत शिवाजीनगर येथे परत येईल. अष्टविनायतक दर्शन यात्रेत प्रत्येक प्रवाशाला ९९० रुपये एवढे भाडे असून, जेवणाचा खर्च व इतर खर्च प्रवाशांनी स्वतः करायचा आहे.
ही सेवा आरक्षण प्रणालीसाठी ATHVNK या सांकेतिक कोडनुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर व इतर संकेतस्थळावरून देखील आरक्षण करता येणार आहे. ही सेवा अल्प दरात असून, प्रवाशांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाचे शिवाजीनगर आगार व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.