Good News | पुणे : पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण (Good News) होणार आहे. एअर इंडियाने 26 मार्चपासून थेट उड्डाण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे या दोन गजबजलेल्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये थेट विमानसेवा नव्हती. एअर इंडिया थेट उड्डाण करणारी पहिली ऑपरेटर ठरली. वेळेची बचत होण्यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. मुंबई-पुणे प्रवास आता एका तासावर येणार आहे.
विमानाचे तिकीट आणि वेळ…
पुणे-मुंबई: सुटण्याची वेळ: सकाळी ११:२०
आगमनाची वेळ: दुपारी १२ :२०
तिकीटचे दर इकॉनॉमी – २,२३७ रुपये
बिझनेस क्लास -१८ ,४६७ रुपये
दरम्यान, उड्डाणे शनिवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सध्याच्या वेळापत्रकानुसार चालतील. एअर इंडियाचे विमान पुणे विमानतळावरून सकाळी ११ .२० वाजता निघून मुंबईत १२. २० वाजता पोहोचेल. त्यासाठीचे बुकिंगही सुरू झाले आहे.
एअर इंडियाच्या घोषणेमुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. जे वारंवार कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी मुंबईत जात असतात त्यांच्यासाठी ही विमानसेवा सोयीची ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून पुण्यातील व्यापाऱ्याचे ४७ लाख रुपये लुटले
Pune News : वारजेतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल
Pune News | पुण्यातील बाल कल्याण समितीला बालविवाह रोखण्यास यश…