पुणे : होळीच्या सणानिमित्ताने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, यामुळे रेल्वेने अजनी ते पुणे दरम्यान वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे . प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे अजनी-पुणे-अजनी दरम्यान आठवड्यातून एकदा धावणारी विशेष रेल्वेगाडी सुरु होणार आहे.
पुणे-अजनी साप्ताहिक एसी सुपरफास्ट स्पेशल (सहा सेवा) गाडी २८ फेब्रुवारी ते १४ मार्च दर मंगळवारी पुण्याहून दुपारी सव्वातीन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४ वाजून ५० मिनिटांनी अजनीला पोहोचेल. तर १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत दर बुधवारी अजनी येथून सायंकाली ७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११ वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.
या गाडीला दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे राहणार आहेत. या गाडीच्या सहा फेऱ्या राहतील. या गाडीला ‘एसी थ्री टिअर’ डबे राहतील.