पुणे : कालवा समितीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यंदा उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी कपातीला सामोर जावे लागणार नाही. त्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
उन्हाळा जवळ येतो, तसतशी नागरिकांच्या मनात पाणी कपातीची धास्ती निर्माण होते. महाराष्ट्रातील अनेक गावांत, जिल्ह्यांत उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होते आणि त्यामुळेच अनेकवेळा पाणीकपात करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागतो. अनेक गावांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, यंदा पुणेकरांची धास्ती टळली आहे. यंदा पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात पंचवीस वर्षातील सर्वात कमी पाऊस झाला होता. मात्र तरीही यावेळी पुणेकरांना पाणी कपातील सामोरे जावे लागणार नाही.
पुणे जिल्ह्यात शेतीलाही पाणी मिळणार आहे. शेतीसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. पहिले आवर्तन ३ मार्चपासून सुरू होणार आहे. शेतीसाठी ७ टीएमसी पाणी सोडणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.