पुणे : सध्या नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. यामुळे अनेकजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांपासून लोके घरात बसूनच सर्व गोष्टींचा आनंद साजरा करत होते. यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर लोकं घराबाहेर पडण्याची शक्यता आहे.
यामुळे आता पुणे जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार नागरिकांना मद्य प्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वन डे परमिट दिले आहे. यामुळे दारू विक्रीची मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. आता यासाठीचे परवाने हॉटेल, बार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
यंदा ३१ डिसेंबरला राज्य उत्पादन शुल्काचे १० विशेष पथके करडी नजर ठेवणार आहेत. यामुळे जल्लोष करताना देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
तसेच यंदा डिसेंबर महिन्यात अनधिकृत मद्य विक्री संदर्भात २४ गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार मद्य परवाने (देशी-विदेशी दारू) म्हणजेच ‘वन डे परमिट’ देण्यात आले आहे. तसेच मद्यपान करून गोंधळ घातला तरी गुन्हा दाखल होणार आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत म्हणाले की, रात्रीच्या गस्ती, अनधिकृत ढाबे, फार्म हाउस तसेच संशयित गाड्यांची तपासणी होणार आहे. यामुळे मद्यपान करून गाडी चालवू नये. नाहीतर काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, वन डे परमिटची किंमत पाच रुपये आहे. विना परवाना मद्य प्राशन किंवा विक्री केली तर गुन्हा दाखल होऊ शकतो. असे सांगण्यात आले आहे. यामुळे मद्यपान करायचे असले तरी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे.